R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या रोमला जाण्यास परवानगी नाकारल्याने ममता बॅनर्जी संतापल्या, मोदी माझ्यावर जाळतात

रोमला जाण्यास परवानगी नाकारल्याने ममता बॅनर्जी संतापल्या, मोदी माझ्यावर जाळतात

 

पश्चिम बंगाल | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा पार पडल्यानंतर अद्यापही तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. इटलीच्या रोममध्ये मदर तेरेसा यांच्या स्मरणार्थ विश्व शांती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

मात्र दुसरीकडे केंद्राने मुख्यमंत्री बॅनर्जी यांना या कार्यक्रमास जाण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. मोदी माझ्यावर जळतात. त्यामुळेच त्यांनी मला रोमला जायची परवानगी नाकारली आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी रोमच्या कार्यक्रमात भाग घ्यावा अशी परिस्थिती नाही. त्यामुळे त्यांना कार्यक्रमाला जाण्यास परवानगी देण्यात येत नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. यापूर्वी केंद्र सरकारने ममता बॅनर्जी यांचा चीन दौराही रद्द केला होता. त्यामुळे राज्य सचिवालयाने नाराजी व्यक्त केली होती. रोममध्ये होणाऱ्या कार्यक्रमात जर्मनीचे चान्सलर अँजेला मर्केल, पोप फ्रान्सिस आणि इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रॅगी सहभागी झाले होणार आहेत. ६ ते ७ ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. मात्र या कार्यक्रमात ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments