R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति 'कोल्हापूरचा गडी कोथरूडला आलाय, पण आमच्या अंगावर येऊ नका'

‘कोल्हापूरचा गडी कोथरूडला आलाय, पण आमच्या अंगावर येऊ नका’

 

पुणे | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यातल्या भोसरीत शिवसेनेची सभा घेतली. आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे पहिले जात आहे. राऊत यांनी त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपला चिमटे काढले आहेत. त्यावेशी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे.

कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पुण्यातून निवडून येतात. पण ते ठिक आहे. ते घासून निवडून आले असतील. यावेळी आपण घासून का होईना पण ठासून निवडून येऊ. चंद्रकांत पाटलांना पुण्यात येऊ द्या. हा महाराष्ट्र आहे. कोल्हापूरचे गडी पुण्यात आले त्याचं वाईट वाटत नाही. फक्त आमच्या अंगावर येऊ नका, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी मंचावरून थे पाटलांना दिला होता.

सभेत बोलताना संजय राऊत यांनी अजित पवारांना देखील टोला लगावला आहे. माझ्याकडे कोणीतरी तक्रार केली की पालकमंत्री आमचं ऐकत नाहीत. अजितदादांना आपण सांगू. नाहीतर आपण मुख्यमंत्र्यांना सांगू. अजितदादा मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. त्यांना जर आपलं ऐकायचं नसेल तर आज मुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर आहे, अशी मिश्किल टिप्प्णी देखील राऊतांनी यावेळी केली आहे. आता राऊत याच्या टीकेला पाटील आणि पवार या प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

  मुंबई | अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला एनसीबी अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच खळबळ माजली होती. त्यातच...

‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’ नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

  मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीयांनी ठाकरे परिवार आणि शविसेना पक्षावर घणाघाती टीका केलेली दिसून आहे. त्यातच मालवण येथे केलेल्या विधानावरून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments