R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश येणाऱ्या काही तासात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

येणाऱ्या काही तासात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

 

मुंबई | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याचा सुमारास आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या कलिंगापट्टणमपासून उत्तरेकडे २५ किलोमीटर अंतरावर धडकले. आज हे वादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत आहेत. ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आज आणि उदया जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

चंद्रपूरमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघरसह १७ जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस कोसळू शकतो. सोमवारसाठी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, सोलापूर, उस्मानाबाद आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील तीन तासांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुण्याच्या परिसरातील घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर येत्या सोमवारी आणि मंगळवारी पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिल्याची माहिती हवामान खात्याने दिली. वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ तयार झाले आहे

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

…पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप !

  राज्यात आघाडीसह सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप लगावले होते.तसेच त्यांच्या आरोपणानंतर अनेकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी...

जनतेने नापास केले तरी तुम्ही सत्तेत, फडणीवसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

  मुंबई | मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांनी विरोधी पक्षावर तसेच सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. याला...

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात संपन्न, अनेक मान्यवरांनी लावली उपस्थितीत

  कोल्हापुर | कोल्हापुरातील करवीरनगरीत पारंपरिक विजयादशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाले....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments