R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति निजामाच्या विचारांचे लोक आजही निवडून येतात, जितेंद्र आव्हाड यांनी साधला MIM वर...

निजामाच्या विचारांचे लोक आजही निवडून येतात, जितेंद्र आव्हाड यांनी साधला MIM वर निशाणा

 

औरंगाबाद |मराठवाड्यातील लोकांनी लढा देऊन स्वातंत्र्य मिळविले. अत्याचारी, पाशवी निजामाचा पराभव केला. कासीम रझवीच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्यांना आज मराठवाड्यातील लोक महानगरपालिकांमध्ये निवडून देतात, हे दुर्दैवी अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी MIM वर नाव न घेता केली आहे.

लोकसंवाद फाऊंडेशन आयोजित ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समोराप कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड रविवारी बोलत होते. मराठवाड्याला एक वर्षे दोन महिने उशिरा स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारत सरकार मदतीला आले; परंतु मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा कासीम रझवी हा शरण आला, तेव्हा त्यास भारतात राहायचे की पाकिस्तानात, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याने पाकिस्तानची निवड केली. निजाम हा अत्याचारी, पाशवी, क्रूर होता. त्याच्या विरोधात मराठवाड्यातील नागरिकांनी लढा दिला, असे आव्हाड म्हणाले.

मराठवाडा उपेक्षित कसा, मराठवाड्याकडे दुर्लक्ष कसे झाले, असा प्रश्न उपस्थित करताना शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अमित देशमुख, राजेश टोपे यांच्यासह इतर मंडळी राज्याचे धोरण ठरविण्यामध्ये असताना मराठवाड्याला प्रतिनिधित्व मिळाले नाही, हे म्हणणे चुकीचे आहे, असे आव्हाड म्हणाले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments