R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पुन्हा सेना खासदाराने साधला अमित शाह यांच्यावर निशाणा दिली, दिली गजनीची उपमा

पुन्हा सेना खासदाराने साधला अमित शाह यांच्यावर निशाणा दिली, दिली गजनीची उपमा

 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षाने भाजपा बरोबर मुख्यमंत्री पदाच्या फॉर्मुल्यावरून फारकत घेत राष्ट्रवादी आणि कॉग्रेस पक्षासोबत युती करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमात सेनेवर टीका करत ५०-५० चा फॉर्मुला ठरला नव्हता अस्से विधान करून सेनेला डिवचले होते. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून खासदार अरविंद सावंत यांनी शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपला ‘गजनी’सारखा झटका येतो आणि अमित शाह हे गजनी आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले. ते रायगडमध्ये बोलत होते. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी रायगडमध्येच बोलताना काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. मात्र आता अरविंद सावंत यांनी अमित शाहांवरच निशाणा साधल्यामुळे, शिवसेना-भाजप युतीबाबत सुरु असलेल्या चर्चा पुन्हा थांबल्या.

सावंत म्हणाले की, मैने ऐसे कोई बोला नही था, हा गजनीचा झटका त्यांना येतो. अमित शाह गजनी असेल, पण उद्धवजी मात्र रामशास्त्री बाण्याचं काम करणारे आमचे नेतृत्व आहे हे लक्षात ठेवा, असं अरविंद सावंत म्हणाले. शिवसेना-भाजपच्या युतीबाबत काय घडलं होतं, भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, असा रोख अरविंद सावंत यांचा होता.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments