R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति अभिनेता भरत जाधव यांच्या नावाचा वापर करून नवोदित कलाकारांची फसवणूक

अभिनेता भरत जाधव यांच्या नावाचा वापर करून नवोदित कलाकारांची फसवणूक

 

अभिनेता भरत जाधव यांच्या चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. खुद्द सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेता भरत जाधव यांनी ही माहिती दिली आहे. असाच घडलेला एका धक्कादायक प्रकार अभिनेता भरत जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणला आहे. भारत जाधवच्या नावाचा वापर करून सिनेमात काम देतो म्हणून ऑडिशन घेत आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच ऑडिशनमध्ये तुमचे सिलेक्शन झाले आहे आणि फोटोशूटसाठी काही रक्कम देखील नवोदित कलाकारांकडून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अभिनेता भरत जाधव याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने लिहिले की, काल एका व्यक्तीचा मेसेज आला की “तुमच्या सिनेमात काम करण्यासाठी मुंबईतील एका एजेंटने आमची ऑडिशन घेतली व सिलेक्शन झाले असून फोटोशूट व पुढील प्रोसेसिंग फी च्या नावाखाली १५०००/- रुपयांची मागणी केली.”

पुढे ते लिहितात की, मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या कोणत्याही सिनेमाचे असे कुठेही ऑडिशन सुरू नाही आहे. जर कोणी माझ्या नावाचा गैरवापर करून किंवा माझ्या सोबतचा एखादा फोटो दाखवून सिनेमात काम मिळवून देतो असे आश्वासन देत असेल तर अशा भूलथापांना बळी पडू नका. कोणालाही पैसे देऊ नका. संबंधित व्यक्तींवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई होईल, असे भरत जाधवने या पोस्टमध्ये सांगितले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

  मुंबई | अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला एनसीबी अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच खळबळ माजली होती. त्यातच...

‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’ नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

  मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीयांनी ठाकरे परिवार आणि शविसेना पक्षावर घणाघाती टीका केलेली दिसून आहे. त्यातच मालवण येथे केलेल्या विधानावरून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments