R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी द्या', नितेश राणेंची मागणी

‘बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी द्या’, नितेश राणेंची मागणी

 

मुंबई | संपूर्ण महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा विषय असलेला बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहे. त्यातच कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे ग्रामीण भागात लोकप्रिय व पारंपरिक खेळ असलेल्या बैलगाड्या शर्यती व बैलांची झुंज या कार्यक्रमांनाही परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
या मागणीवर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही बैलगाडा शर्यतीसाठी वटहुकूम काढण्याची तयारी दाखविली आहे. बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत. बैलगाडा शर्यती व बैलांची झुंज ग्रामीण भागातील लोकप्रिय व पारंपारिक कार्यक्रम आहेत आणि ते फार पूर्वीपासून साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमांनाही सुरू करण्याची परवानगी मिळावी. या कार्यक्रमांत बैलांना कोणत्याही प्रकारची इजा व दुखापत होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाईल तरी या कार्यक्रमांना नियम व अटींच्या अधीन राहून सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

त्यातच सातत्याने बैलगाडा संघटना आणि शेतकऱ्यांचीही बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी मागणी वाढते आहे. अशातच गृहमंत्री देशमुख यांना पत्रकारांनी याच विषयावर प्रश्न विचारले असता त्यांनी बैलगाडा शर्यत सुरु करण्याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया देताना वटहुकूम काढणार असल्याचं म्हटलं.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

Recent Comments