R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या '३ सदस्यीय प्रभाग जड जाणार, भाजपसोबत युती केल्यास फायदा

‘३ सदस्यीय प्रभाग जड जाणार, भाजपसोबत युती केल्यास फायदा

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात येणाऱ्या स्थानिक निवडणुकीसाठी युती होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसून येत होती. त्यात नाशिक येथे प्रदेशाध्यक्ष पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशक येथे त्यानंतर कृष्णकुंज येथे झालेल्या भेटीनंतर लवकरच युती होईल अशी शक्यता वर्तवली जात होती.

त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणै दौऱ्यात मोठी वाढ झाली आहे. तसंच मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण करण्याचं काम राज ठाकरे करत आहेत. अशावेळी पुण्यातील मनसे नेत्यांनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे. त्याबाबत पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी उघड प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये ३ सदस्यीय प्रभाग जाहीर झाल्यामुळे आम्हाला जड जाणार आहे. त्यामुळे भाजपसोबत युती झाली तर त्याचा फायदा होणार आहे. भाजपसोबत गेलो तर सत्तेत सहभागी होऊन शहराचा विकास करता येणार आहे, असं नगरसेवक वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. मात्र, भाजपसोबत युती करायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय हा राज ठाकरे घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच मनसे नेते अनिल शिरोदे आणि बाबू वागस्कर यांच्याशी याबाबत बोलणं झाल्याची माहितीही मोरे यांनी दिली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments