R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱयांना ५ लाख बिनव्याजी कर्ज देणार

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱयांना ५ लाख बिनव्याजी कर्ज देणार

 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ८३ वी सर्वसाधारण वार्षिक सभा सोमवारी कोल्हापुरात पार पडली या सभेत शेकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येणार आहे. बँकेच अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या वार्षिक सभेत ही घोषणा केली आहे. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

बँकेची वार्षिक आढावा बैठक सोमवारी झाली. यामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात नऊ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आणि १७५ कोटी रुपयांच्या नफ्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. शून्य़ टक्क्याने कर्ज देणारी केडीसीसी ही ही पहिलीच बँक असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. बँकेचे सभासद असलेल्या लाखो शेतकऱ्यांनी शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याची मागणी केली होती. यामुळे तीन लाखांची कर्ज मर्यादा वाढवून पाच लाख करण्यात आली आहे.

संचालक मंडळाने प्रशासकाकडून सहा वर्षांपूर्वी बँकेची सूत्रे ताब्यात घेतली. तेव्हा बँक तोट्यात होती. गेल्या सहा वर्षांत १०३ कोटी रुपयांचा तोटा भरून काढत बँकेने १४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. सध्ये बँकेत ७१४१ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवी ९००० कोटी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. बँकेने १८.२२ कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरला आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments