R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति करुणा शर्मा प्रकरणावरून भाजपा नेत्या पंकजा मुंडेंचा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा

करुणा शर्मा प्रकरणावरून भाजपा नेत्या पंकजा मुंडेंचा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत त्यातच करुणा शर्मा यांच्या प्रकरणांमधून मोठा वाद परळीमध्ये निर्माण झाला होता. याच मुद्द्यावरून आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. प्रशासन दावणीला बांधलेले असल्यास खोटे गुन्हे दाखल होत आहेत. बीडमध्ये शासन आणि प्रशासन दोघे मिळून अन्याय करत आहेत, त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा’ असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी करुणा शर्मा प्रकरणावरून नाव न घेता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा या बीडमध्ये दाखल झाल्या होत्या. परंतु, गाडीत पिस्तुल सापडल्यामुळे त्यांना अटक करून जामीन देण्यात आला आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा हा दलितांचे कवच कुंडल आहे, दलित वर्गाच्या सुरक्षेसाठीच त्याचा वापर झाला पाहिजे मात्र, त्याचा दुरुपयोग होतोय हे अतिशय गंभीर आहे. प्रशासन दावणीला बांधलेले असल्यास खोटे केसेस दाखल होतात. तेच सुरू आहे बीडमध्ये शासन आणि प्रशासन दोघे मिळून अन्याय करत आहेत तर न्याय कोणाकडे मागावा, असा घणाघात पंकजा मुंडे यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यासह राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. याचा तीव्र संताप आणि निराशा मी व्यक्त करते. जिल्ह्यात देखील रोज घटना घडत आहेत, हे फार गंभीर आहे. परळी जवळील सोनपेठमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. भयानक आहे, मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला. जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी एक माफिया तयार झाले आहे. तसा पोलिसांचा धाक राहिला नाही. खोट्या केसेस केव्हा होतात तर प्रशासन दावणीला बांधलेले असल्यास खोटया केसेस दाखल होतात. प्रशासनाने न्याय्य भूमिका घेणे गरजेचे आहे तर या गोष्टी होणार नाही. मात्र बीड मध्ये दोघेही मिळून काय करत आहेत असा घणाघात पंकजा मुंडे यांनी केला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments