R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात एसटी गेली वाहून, तीन जणांचा मृत्यू

यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात एसटी गेली वाहून, तीन जणांचा मृत्यू

 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादाळामुळे राज्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली असून मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. जोरदार पाऊस सुरु असताना एसटी चालकाने पुराच्या पाण्यातून बस काढण्याचा प्रयत्न जिवावर बेतला आहे. सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान नांदेडहून नागपूरला पुसदमार्गे जाणारी बस उमरखेडपासून दोन किमी दहांगाव नाला पार करत असताना पुराच्या पाण्यात बस वाहून गेली.

मात्र पुराच्या पाण्यातून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न बस चालकाने केला होता. पण त्यांच्या प्रयत्नांना यश न आल्यामुळे बस पुराच्या पाण्यात वाहून गेली. बसमध्ये साधरणमध्ये पाच जण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बस नांदेडहून पूसदमार्ग नागपूरला निघाली होती.दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थितीती उद्भवली आहे.

उमरखेडपासून दोन किमी अंतरावर असलेल्या दहांगाव नाला येथून चालकाने बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूराच्या पाण्याच्या वेग जास्त होता. यामध्ये बस वाहून गेली आहे. उमरखेड ते पुसद मार्गावर दहागाव नाल्यावर नागपूर आगाराची बस क्र. ५०१८ वाहून गेली. या बसमध्ये पाच जण होते. दोन प्रवाशांना वाचवण्यात यश असून तीन मृतदेह मिळाले. आहे. घटनास्थळापासून ५० मीटरवर बस आढळल्याची माहिती यवतमाळचे प्रभारी विभाग नियंत्रक अविनाश राजगुरे यांनी दिली.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments