R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति काय सांगता मोदी सरकार सरकारी कंपन्यांची ३५०० एकर जमीन विकणार

काय सांगता मोदी सरकार सरकारी कंपन्यांची ३५०० एकर जमीन विकणार

 

नवी दिल्ली | केंद्र सरकारने सध्या खासगीकरणावर भर दिला असून या अंतर्गत अनेक सरकारी कंपन्यांची भागिदारी विकली जात आहे. काही सरकारी कंपन्यांचे आंशिक तर काहींचे पूर्णतः खासगीकरण होत आहे. आता काही सरकारी कंपन्यांच्या जमिनी आणि अन्य संपत्ती विकण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यासाठी केंद्र सरकार ‘नॅशनल लँड मनिटायझेशन कॉर्पोरेशन’ नावाची कंपनी स्थापन करणार आहे.

जनसत्ता या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सध्या सरकारी क्षेत्रातील कंपन्यांची जमीन तसेच नॉन कोअर गटातील संपत्ती विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.या प्रक्रियेअंतर्गतच या कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. या कंपनीची मालकी सर्वस्वी सरकारकडे असेल. लवकरच या कंपनीला कॅबिनेटची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

या कंपनीचं अधिकृत प्राथमिक भागभांडवल ५ हजार कोटी रुपये इतकं असेल. यासोबत कंपनीकडे १५० कोटी रुपयांचे भाग भांडवलही असणार आहे. कंपनीचं संचालन करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येईल, ज्यात संबंधित मंत्रालयांचे सचिव तसेच रियल इस्टेट क्षेत्रातील आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगचे प्रतिनिधी सहभागी असतील. मात्र या निर्णयावर विरोधक काय प्रतिक्रिया देतायत हे पहावे लागणार आहे.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

इंधन दरवाढीवर आंदोलन करणारा भाजप आता गप्प का ?

  मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments