R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या रस्त्यावरचे खड्डे पाहून महापौर पेडणेकर भडकल्या मात्र मनसेने उडवली खिल्ली

रस्त्यावरचे खड्डे पाहून महापौर पेडणेकर भडकल्या मात्र मनसेने उडवली खिल्ली

 

मुंबई आणि खड्डे हे समीकरण प्रत्येक पावसाळ्यात मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर पाहायला मिळत. त्यात खड्ड्यांचं खापर दरवर्षी मुंबई महानगर पालिकेवर फोडलं जातं, तसेच सत्तेत असलेल्या शिवसेनेवर थेट टीका होते. हे चित्र यंदाही पाहायला मिळतं आहे. मात्र, सोमवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट मुंबईच्या रस्त्यावर उतरुन अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आणि खड्डे का पडले याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला. तर यावरून आता शिवसेनेचू नौटंकी म्हणून मनसेने खिल्ली उडवली आहे.

मनसेचे स्थानिक नेते गणेश चुक्कल यांनी मुंबईच्या रस्त्यावर बिनपैशाचा तमाशा सुरू आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे दरवर्षी मुंबईकर जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात. वारंवार कोट्यवधीचे टेंडर काढले जातात. त्यातून वसुली जोरात होते. सत्ताधारी निगरगट्ट बनतात. परंतु मुंबईच्या महापौरांना कदाचित पहिल्यांदाच हे खड्डे दिसले असावेत. त्यामुळे मी मारल्यासारखं करते अन् तू रडल्यासारखं कर असाच डाव शहरातील रस्त्यावर मुंबईकरांना मोफत पाहायला मिळत आहे. निवडणूक जवळ आल्यानं अशा नौटंकी पाहायला मिळणार पण जनता तुमच्या खोट्या नाटकाला नाही भूलणार अशा शब्दात त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

तर दुसरीकडे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलंय की, मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे पाहून महापौर किशोरी पेडणेकर यांना बसलेला धक्का आणि त्यातून उसळलेला सात्विक संताप पाहा. Grinning face बहुधा आयुष्यात प्रथमच त्यांनी खड्डे पाहिले आहेत. किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments