R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश कीर्तनकार ताजुद्दीन महाराज यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कीर्तनकार ताजुद्दीन महाराज यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख यांचे रात्रीच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जामदे येथे कीर्तन सुरू असताना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी महाराज पारायण सप्ताह निमित्त सातव्या दिवशी सोमवार त्यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

ताजोद्दीन महाराज यांना कीर्तन सुरू असतानाच हृदय विकाराचा झटका आला आणि ते अचानक खाली कोसळले. यानंतर स्थानिक मंडळी त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथे नेत असतानाच रस्त्यातच त्याचे निधन झाले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपूर्वी साक्री तुलुक्यातील प्रतापूर येथे सप्ताहनिमित्त हरिभक्त परायण ताजोद्दीन महाराज शेख यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते म्हणाले होते, की मला कीर्तन करताना मरण आले, तर माझ्या सारखा भाग्यवान मीच असेल. तो योगायोग महाराजांच्या जीवनात घडून आला. साक्री तालुक्यातील जामदे, या गावात ज्ञानेश्वरी पारायणनिमित्ताने सुरू असलेल्या कीर्तनात महाराजांना हृदयविकाराचा झटका आला आणि नंदुरबार येथे उपचारासाठी घेऊन जात असताना महाराजांनी रस्त्यातच देह ठेवला.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

समीर वानखेडेऐवजी दुसरा अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास?

  मुंबई | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर अनेक स्वरूपाचे गंभीर आरोप लगावून एकच खळबळ उडवून दिली होती. मंत्री नवाब...

कामगारांच्या समस्या मांडून मनसे कामगार सेना कंपनीतून बाहेर पडताच शिवसेनेच्या कामगार संघटनेची कर्मचाऱ्यांना अरेरावी

  मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहेत. त्यात येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये वाद होत असल्याचे चित्र...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments