R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त दिल्या हटके शुभेच्छा !

राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त दिल्या हटके शुभेच्छा !

 

लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. २५ हजारांहून अधिक गाणी गाणाऱ्या लतादीदी म्हणजे भारताला लाभलेलं अनमोल सूररत्न आहे. सन 19 साली ‘किती हसाल’ या मराठी सिनेमासाठी पहिलं गाणं गायलं आणि पुढे त्यांच्या जादुई आवाजानं जगभरातील संगीतप्रेमींना वेड लावलं. आज लतादिदीचा ९२ वा वाढदिवस आहे. त्यामुळे, देशभरातील दिग्गजांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही लतादीदींना हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरेंनी स्वातंत्र्यपूर्व काळातील काही आठवणी जागवत लतादीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड कलाकारांपासून ते देशाचे गृहमंत्री अमित शहांपर्यंत अनेक दिग्गजांनी लता दीदींना वाढदिनी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या, ‘भारतीय गानकोकीळा’ लता दीदींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!, असे ट्विट राज ठाकरेंनी केले आहे.

 

सन १९४२ मध्ये जेव्हा अवघा भारत ब्रिटीशांना उद्देशून भारत छोडोचा नारा देत होता. तेव्हा, एका १३ वर्षांच्या मुलीने भारतीय सिनेसृष्टीत गायिका म्हणून पदार्पण केलं. लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्ये झाला. मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments