R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या जावयाचं नाव सातत्याने घेऊ नका, हे काही बरोबर नाही, हसन मुश्रीफ कडाडले

जावयाचं नाव सातत्याने घेऊ नका, हे काही बरोबर नाही, हसन मुश्रीफ कडाडले

 

कोल्हापूर | भाजप नेते किरीट सोमय्यांकडून जावयला सातत्याने टार्गेट केलं जात असल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ संतापले आहेत. माझ्या जावयाचा कशाशीही काहीही संबंध नाही. त्यांचं नाव सातत्याने घेऊ नका. हे काही बरोबर होणार नाही, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. आज सोमय्या यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ यांच्या जावयाचे नाव घेत गंभीर आरोप लगावले होते

हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. सोमय्यांनी तिसरा घोटाळा जाही केला. खरे तर ते दहा अकरा वर्षापूर्वीचे जुने कारखाने आहेत. माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही तरी काढा असं त्यांना सांगत होतो. पण त्यांनी एक जावई शोध लावला आणि आज आणखी एक घोटाळा काढला. त्यात माझ्या जावयाचं नाव घेतलं. मी त्यांना सूचना करेल जावयाचं नाव आणि कुटुंबीयांचं नाव ते सातत्याने घेत आहेत. हे काही बरोबर नाही. ज्याचा कशाचाही संबंध नाही. माझा जावई स्वत:चा व्यवसाय करत आहे. त्यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान सोमय्या करत आहेत. हे निषेधार्य आहे, असं मुश्रीफ म्हणाले.

सोमय्यांनी आज तिसरा घोटाळा जाहीर केला. दुसऱ्या घोटाळ्याचा आज त्यांनी काही उल्लेख केला नाही. त्यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. पण त्यांनी पुन्हा अशी वक्तव्ये करू नये म्हणून त्यांच्यावर बंदी आणण्याची याचिकाही दाखल केली होती. आजच त्याची सुनावणी सुरू होती. पण त्याची नोटीस त्यांनी घ्यायला नकार दिला. त्यामुळे या प्रकरणावर सुनावणी होऊन त्यावर एकतर्फी निर्णय येण्याची शक्यता आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments