R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति हसन मुश्रीफ यांचा पुन्हा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा दावा

हसन मुश्रीफ यांचा पुन्हा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा दावा

 

कोल्हापूर | ग्रामविकास विभागात दीड हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप बिनबुडाचा आणि त्यांच्या अकलेची कीव आणणारा आहे, असे स्पष्ट करत सोमय्या यांनी सारखे खोटेनाटे आरोप करणे थांबवून माफी मागावी नाहीतर अब्रूनुकसानीच्या दाव्यास सामोरे जावे, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिला.

आपल्यावर तथ्यहीन, बिनबुडाचे आरोप करणार्‍या किरीट सोमय्या यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा कोल्हापूर दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. सोमय्या यांना नोटीसही दिली आहे. त्यांनी नोटीस घेतली नाही. ग्रामविकास विभागाच्या जीएसटी-टीडीएस भरण्यासाठी नेमलेल्या ‘मे. जयस्तुते मॅनेजमेंट प्रा. लि.’ कंपनीला दिलेल्या कंत्राटामध्ये दीड हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. हे आरोप खंडित करून सत्य बाजू समोर मांडली होती.

आजपर्यंत या कंपनीला एकही ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेने करार करून काम दिले नाही की या कंपनीला आतापर्यंत एकाही पैशाचे देयक प्रदान करण्यात आलेले नाही. त्यामुळे सोमय्या यांनी दीड हजार कोटी रुपयांच्या घोटाळा झाल्याचा लावलेला शोध कीव करण्यासासारखा आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“मी शिवसेनेत होतो तेव्हा ते खासदार सुद्धा नव्हते, भुजबळांनी लगावला टोला

  नाशिक | नाशिक येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला होता....

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments