R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश आज मुंबई, पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट जारी

आज मुंबई, पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट जारी

 

मुंबई | गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असून चक्रीवादळाचं आता कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाल्यानं पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. आज मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर ठाण्यासह सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीप्रमाणमे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाचं रुपांतर आता कमी दाबाच्या पट्ट्यात झालं आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. कमी दाबाच्या राहिलेल्या पट्ट्यामुळे आज मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबईत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांत दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून, आज ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून, पावसाचा जोर वाढणार आहे, असं हवामान विभागाबरोबरच मुंबई महापालिकेनंही म्हटलं आहे. तसेच महानगर पालिकेची यंत्रणा सुद्धा कामाला लागली आहेत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

समीर वानखेडेऐवजी दुसरा अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास?

  मुंबई | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर अनेक स्वरूपाचे गंभीर आरोप लगावून एकच खळबळ उडवून दिली होती. मंत्री नवाब...

कामगारांच्या समस्या मांडून मनसे कामगार सेना कंपनीतून बाहेर पडताच शिवसेनेच्या कामगार संघटनेची कर्मचाऱ्यांना अरेरावी

  मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहेत. त्यात येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये वाद होत असल्याचे चित्र...

आर्थररोड जेलमध्ये शाहरुखनंतर ‘ही’ व्यक्ती पोहचली आर्यनच्या भेटीला

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख त्याला जेलमध्ये भेटायला गेला होता. आता बातम्या येत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

Recent Comments