R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या गोव्यात भाजपकडून लोकप्रतिनिधी फोडून सत्तेचा 'खो खो'चा खेळ सुरू

गोव्यात भाजपकडून लोकप्रतिनिधी फोडून सत्तेचा ‘खो खो’चा खेळ सुरू

 

गोवा विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच आता शिवसेनेने सुद्धा गोवा विधानसभा निवडणुकीसाठीआपली कंबर कसली आहे. आज गोवा दौऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत निघाले असून गोव्यातून शिवसेना निवडणूक लढवणार असल्यामुळे आपण तिकडे चाललो असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच लोकप्रतिनिधींना फोडून भाजपने गोव्यात सत्तेचा खो खो सुरू केला आहे. जनतेला थापा मारून त्यांची फसवणूक केली जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मीडियाशी संवाद साधताना भाजपला लक्ष्य केलं आहे. लहान राज्यात सरकार आणून किंवा लोकप्रतिनिधी फोडून सत्तेचा खो खोचा खेळ सुरू आहे. गोव्याच्या जनतेची फसवणूक सुरू आहे. जे निवडून आले आहेत ते पक्ष बदल करत आहेत आणि ज्या पक्षात जात आहेत त्यांना लाज नाही असं म्हणत राऊत यांनी काँग्रेस आणि भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले की, गोव्यात आप, तृणमूल सारखे पक्ष निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेची गोव्यात ताकत आहे. आम्ही 22 जागा लढवणार आहोत. गोव्याच सरकार रोज नवीन थापा मारत आहे. गोव्यात ड्रग्स आणि कॅसिनोचा हौदोस घातला आहे. कॅसिनोच्या विरुद्ध प्रचार करून भाजप सत्तेवर आला. आता ते त्यांच समर्थन करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments