R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील गोंधळांची मुख्यमंत्र्याकडून गंभीर दखल;

आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील गोंधळांची मुख्यमंत्र्याकडून गंभीर दखल;

 

मुंबई | आरोग्य विभागाच्या सरळ सेवा भरती परीक्षेत ऐनवेळी गोंधळ झाल्याने याचा परीक्षा देणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. तसेच परिक्षा रद्द करत पुढे ढकलण्यात आल्या या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत ‘वर्षा’ या निवासस्थानी बोलावलेल्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘न्यासा’ कंपनीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

आता नव्याने सदर परीक्षा प्रवेशपत्रक पाठवताना किमान दहा दिवस आधी परीक्षार्थींना त्यांच्या परीक्षा केंद्राची सविस्तर माहिती द्यावी, असे आदेश देत यावेळी पुन्हा चूक झाली तर परीक्षा घेणाऱ्या संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेबाबतच्या गोंधळाची दखल घेत बैठक बोलावली. त्यावेळी आरोग्य मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘न्यासा’ नावाच्या कंपनीला परीक्षा घेण्याचे अधिकार दिले त्या कंपनीची विश्वासार्हता तपासून कंपनीच्या आतापर्यंतच्या अनुभवाचाही आढावा सादर करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते. रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेचे नव्याने वेळापत्रक ठरवताना कोणत्याही त्रुटी आता राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments