R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राजीनाम्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांचा व्हिडीओ संदेश चर्चेत

राजीनाम्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांचा व्हिडीओ संदेश चर्चेत

पंजाब | पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकचं खळबळ उडाली होती. यानंतर आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. यात, आपण शेवटच्या श्वासापर्यंत हक्क आणि सत्याची लढाई लढत राहणार. तसेच नैतिकतेशी कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे सिद्धूंनी म्हटले आहे.

या व्हिडिओमध्ये सिद्धू म्हणाले, मी १७ वर्षांचा राजकीय प्रवास एका उद्देशाने केला. पंजाबमधील नागरिकांचे जीवन सुधारणे आणि एखाद्या मुद्द्यावरील राजकारणावर एक स्टँड घेऊन उभे राहणे, हाच माझा धर्म आहे आणि हेच माझे कर्तव्यही आहे. माझे काही वैयक्तिक भांडण नाही. मात्र, माझी लढाई मुद्द्यांची आहे. पंजाबच्या भल्यासाठी उभे राहणे हा माझा अजेंडा आहे आणि मी त्याच्याशी तडजोड करू शकत नाही आणि मी सत्यासाठी लढत राहणार. एवढेच नाही, तर भ्रष्ट मंत्र्यांना पुन्हा आणण्याचा निर्णय आपण कधीही स्वीकारणार नाही, असेही सिद्धू यांनी म्हटले आहे.

पंजाबमध्ये मंगळवारी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि परिणामी काँग्रेससमोर एक नवे संकट उभारले. सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमधील त्यांच्या निकटवर्तीय एका मंत्र्याने मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या मंत्रिमंडळातूनही राजीनामा दिला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments