R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "सावरकरांना भारत फक्त जमिनीचा तुकडा वाटायचा!!" राहुल गांधी यांनी पुन्हा साधला निशाणा

“सावरकरांना भारत फक्त जमिनीचा तुकडा वाटायचा!!” राहुल गांधी यांनी पुन्हा साधला निशाणा

 

खासदार राहुल गांधी यांनी आज केरळ दौऱ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पुन्हा एकदा बेछूट टीका केली आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडत आहे. आणि राहुल गांधी त्याच्या विरुद्ध टोकाला केरळमध्ये जाऊन सावरकर – मोदींवर तोफा डागत आहेत. आता त्यांच्या या आरोपांमुळे पुन्हा एकदा देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येणार आहे.

मल्लापुरममध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना ते म्हणाले, की सावरकरांसारख्या लोकांनी भारताच्या संकल्पनेला सुरुंग लावला. त्यांना भारत म्हणजे एक भूमीचा तुकडा वाटायचा. त्यांनी एक पेन घेतले आणि हिंदू-मुस्लीम अशी भारताची विभागणी करून टाकली. भारताच्या एका बाजूला हिंदू आहेत दुसऱ्या बाजूला मुस्लीम आहेत. जिथे हिंदू आहे तोच भारत आहे, असा प्रचार – प्रसार त्यांनी केल्याचा बेछूट आरोप राहुल गांधी यांनी सावरकरांवर लावला.

तसेच मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी देखील “आयडिया ऑफ इंडिया”वर आघात केला. ते देखील हिंदू-मुसलमान समाजामध्ये फूट पाडण्यावरच विश्वास ठेवतात. त्यांना हिंदू आणि मुसलमान बंधूभावाचे नाते, हिंदी – तमिळ – मल्याळम – मराठी या भाषांचे भगिनी नाते मान्यच नाही आणि म्हणून माझा मोदी आणि सावरकरांच्या विचारसरणीला विरोध आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments