R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक शिवसेना, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश*

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक शिवसेना, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश*

मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीला ऊत आला आहे. त्यातच आता भारतीय जनता पक्षाने सत्तेत आलेल्या शिवसेना पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. मुंबईतील शिवसेना, काँग्रेस, भारिप पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला.

दादर येथील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेशावेळी आमदार सुनील राणे, संजय उपाध्याय, माजी आमदार तृप्ती सावंत, राजेश शिरवडकर, शिवा शेट्टी उपस्थित होते. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे, त्या अगोदर शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी तसेच इतर पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, हा एकप्रकारे आमदार नितेश राणेंनी शिवसेनेला दिलेला धक्का मानला जात आहे.

या प्रमुख पदाधिकाऱ्यांसहित कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये आज प्रवेश केला. आज झालेल्या पक्षाप्रवेशात महिला आणि तरुणांचा मोठ्याप्रमाणावर समावेश होता. दरम्यान, याप्रवेश सोहळ्यानंतर आमदार नितेश राणे यांनी बोलताना, मुंबई महानगर पालिकेवर भाजपचा भगवा फडकविण्याच्या निर्धार व्यक्त केला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments