R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पाणी वळविण्याच्या प्रकल्पांना मंजुरी देण्याचा प्रयत्न करणार - जयंत पाटील

पाणी वळविण्याच्या प्रकल्पांना मंजुरी देण्याचा प्रयत्न करणार – जयंत पाटील

पश्चिमेकडील समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडील दुष्काळी भागाकडे वळविण्याचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अकोले तालुक्यातील सहा ठिकाणी या माध्यमातून प्रयोग करता येईल. यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्या प्रस्तावाला वन विभागाची मंजुरी घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वाईल्ड लाईफ बोर्डाची बैठक घेण्यात येईल. या बैठकीत या सहा प्रकल्पांना मंजुरी देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्री जयंत पाटील म्हणाले, नगर शहरातील सीना नदीची निळ्या पूर नियंत्रणरेषेचे सर्वेक्षण करून ती रेषा आणखी आत येण्यासाठी या नदीचे खोलीकरण केले जाईल. यात एनजीटीच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जाईल. भविष्यात पाणी नदीपात्राबाहेर पडणार नाही, या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला जाईल. राज्यातील जुन्या कालव्यांच्या दुरुस्तीचा विषय पाटबंधारे विभागाने हाती घेतला आहे.

नगर जिल्ह्यात गोदावरीच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी 84 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अशीच परिस्थिती जायकवाडीच्या कालव्यांचीही आहे. त्याचेही एस्टिमेट तयार करण्यास सांगितले आहे. कालव्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार असून, त्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करण्याचाही विचार करणार असल्याचे ते म्हणाले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments