R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति माजी मुख्यमंत्री अमरिंदर यांनी घेतली अमित शहांची भेट

माजी मुख्यमंत्री अमरिंदर यांनी घेतली अमित शहांची भेट

 

पंजाब | पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून नाइलाजाने राजीनामा द्यावा लागल्याने नाराज असणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्यात पाऊण तास चर्चा झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या भेटीमुळे येणाऱ्या पंजाब निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात त्या राज्यात सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्रिपद गमवावे लागल्यानंतर अनेक पर्याय खुले असल्याची प्रतिक्रिया देणाऱ्या अमरिंदर यांनी मंगळवारी दिल्ली गाठली. तसेच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

त्यानंतर बुधवारी ते शहा यांच्या निवासस्थानी दाखल झाले. दोघांची भेट विविध प्रकारच्या राजकीय चर्चांना खतपाणी घालणारी ठरणारी आहे. शहा यांची भेट घेतल्यानंतर अमरिंदर यांनी पुढील राजकीय वाटचालीबाबतचे आपले पत्ते खोलले नाहीत. अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या त्या भेटीबाबत अमरिंदर यांच्या वतीने ट्‌विट करण्यात आले. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत शहा यांच्याशी चर्चा केली. कृषी कायदे मागे घेऊन पेच मिटवण्याची विनंती त्यांना केली, असे त्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

निवडणूकीला जो बायडन घेऊन या; संजय राऊतांचा भाजपला टोला

  दादरा नगर हवेलीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कंबर कसली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने अनेक...

“प्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावे” काँग्रेसच्या या नेत्याचा सल्ला

  नवी दिल्ली | राजकारणातील चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर सध्या चांगलेच चर्चेत आलेले दिसून येत आहे. किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अद्याप काही माहिती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments