R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया "राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्याला ५०,००० रुपयांची मदत द्या" - मनसे

“राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्याला ५०,००० रुपयांची मदत द्या” – मनसे

 

राज्यात झालेली अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी पूर्वपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच या पूर्वपरिस्थतीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. शेतीचंही प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. राज्यात झालेल्या या अतिवृष्टीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांना तातडीची मदत जाहीर करण्याचीही मागणी केली आहे. ५० हजारांची मदत तातडीने जाहीर करा राज ठाकरेंनी म्हटलं, “महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे.

हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे. परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला, शेतकऱ्याला ५०,००० रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ मदत द्यावी. आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पार कोलमडला आहे अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे.”

त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पाहण्याची ताकद आत्ता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

  नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे...

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments