R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पुण्यात भाजपशी युतीबाबत मनसेची सावध भूमिका

पुण्यात भाजपशी युतीबाबत मनसेची सावध भूमिका

पुणे | पुणे महानगरपालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिलेले असताना पुण्याचा गड जिकंण्यासाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे मानपावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच मनसे-भाजपा युतीच्या चर्चांना उधाण आलेले असताना यावर आता या चर्चांना मनसेने तूर्तास विराम दिला आहे. याबाबत पक्षाने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

तसेच शहर पदाधिकाऱ्यांनी याबाबत कोणतेही वक्‍तव्य करू नये, असे आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक बोलवली आहे. भाजपसोबत युतीबाबत यावेळी चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात पुढील वर्षी महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि मनसेच्या युतीची अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा झाल्याने पुण्यातही ही युती होण्याची चर्चा होती. दुसऱ्या बाजूला राज्य शासनाने तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे, तर २०१७ मध्ये मनसेला चारच्या प्रभाग रचनेत सर्वाधिक फटका बसला असून, यात पक्षाच्या नगरसेवकांची संख्या २८ वरून थेट २ वर आली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments