R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल

सोलापूर |  माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यावरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात इंधन आणि गॅस सिलेंडर सह जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दाखल झालेल्या तक्रारीमुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे.

त्यातच दहा दिवसापूर्वी सोलापुरात काँग्रेसचा मेळावा पार पडला होता. यावेळी राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत भाष्य केले होते. यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, “आमदार प्रणिती शिंदे आमच्यासोबत मंत्रिमंडळात नाहीत याची खंत वाटते. मात्र कदाचित लवकरच प्रणिती शिंदे या राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्रीच नव्हे तर कॅबिनेट मंत्री होतील असे विधान मंत्री विश्वजीत कदम यांनी केले होते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments