R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या गोव्यात शिवसेना पक्षाची सत्ता आल्यास, संजय राऊत यांचे मोठे विधान !

गोव्यात शिवसेना पक्षाची सत्ता आल्यास, संजय राऊत यांचे मोठे विधान !

 

गोवा | उत्तरप्रदेश पाठोपाठ शिवसेना आता गोवा विधसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला टक्कर देणार आहेत . त्यातच खासदार संजय राऊत यांनी गोवा विधानसभेच्या २२ जागांवर शिवसेना उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे. बुधवारी राऊत यांनी ही घोषणा केली. तसेच गोव्यामध्ये शिवसेनेचं सरकार आलं तर शिवसेना महाराष्ट्रामधील प्रशासनाप्रमाणे गोव्यामध्येही चांगली कामगिरी करणारं सरकार देईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय.

राऊत म्हणाले की, शिवसेना २२ जागांवर निवडणूक लढणार आहे. आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. आम्हाला कोणत्याही युतीची गरज नाही. आमची पक्षबांधणी उत्तम आहे. तर कोलकात्यामधील तृणमूल गोव्यात निवडणूक लढवू शकते तर महाराष्ट्र गोव्याच्या बाजूलाच आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये कशी कामगिरी केलीय हे तुम्ही पाहू शकता असं त्यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना बोलून दाखविले होते.

“महाराष्ट्रामध्ये शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे आम्ही त्याच पद्धतीने गोव्यात काम करु. शिवसेना आणि गोव्याचं भावनिक नातं आहे,” असं राऊत म्हणाले. मात्र आता गोव्याची जनता शिवसेना पक्षाला स्वीकारते का हे येणाऱ्या निवडणुकीला दिसून येईल.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments