R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या दोन्ही डोस घेऊन सुद्धा केईएम रुग्णालयात २२ विद्यार्थ्यांना झाली कोरोनाची लागण |

दोन्ही डोस घेऊन सुद्धा केईएम रुग्णालयात २२ विद्यार्थ्यांना झाली कोरोनाची लागण |

मुंबई | राज्यात कोरोनाच्या संसर्गाह धोका कमी होत असताना दुसरीकडे मुंबईतुन एक खळबळजन बातमी समोर येतं आहे. मुंबईतल्या केईएम वैद्यकीय महाविद्यालयातल्या २२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. चिंतेची बाब अशी आहे की, या विद्यार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या होत्या. क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे करोनाचा प्रसार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना पेडणेकर यांनी सर्व नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पेडणेकर म्हणाल्या, वेगवेगळी महाविद्यालये आणि केईएम रुग्णालयाचे २२ असे मिळून एकूण २९ करोनाबाधित आहेत. मला आत्ताच कळालं की, या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा सुरू होत्या. आपले मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री सातत्याने सांगत आहेत की, लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी मास्क काढू नका, हेच संरक्षण आहे. काही विद्यार्थ्यांना थोडा त्रास जाणवत आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा भरवल्यामुळे निष्काळजीपणा झाला असू शकतो. त्यामुळे त्यांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे काहीही झालं तरी मास्क असायलाच हवा. कोरोना आजही संपलेला नाही. काळजी न करता काळजी घेतली पाहिजे. ही घटना काळजी करण्यासारखी नाही. सौम्य लक्षणं असलेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून इतरांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments