R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "पैसे नसतील तर आमदार-खासदारांचे पगार वर्षभर थांबवा"

“पैसे नसतील तर आमदार-खासदारांचे पगार वर्षभर थांबवा”

 

मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच फक्त राज्य सरकारकडून अश्वासनाची खैरात करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेऊन राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ विना अट ५० हजाराची मदत करावी. पैसे नसतील तर आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे पगार एक वर्षासाठी थांबून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यासह सबंध महाराष्ट्रामधील सोयाबीन, कपाशी, तूर, उडदाचे, मुगाचे पीक वाहून गेलेले आहे. शेतकरी पूर्ण अडचणीत आलेला असून शेतीचे नुकसान झालं आहे. शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. आता चार-पाच वर्षे जमीन नीट होणार नाही, अशी परिस्थिती आहे. खोलीकरण नसल्यामुळे पाणी सगळ्या शेतांमध्ये आलेला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली

आज संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ विना अट ५० हजाराची मदत कारवी, पैसे नसतील तर आमदार, खासदार – मंत्र्यांचे पगार एक वर्षासाठी थांबून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शेतकरी संघटनेना आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments