R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या जास्त नुकसानीच्या परिसरात सरसकट पंचनामे तर आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीचेही निर्देश !

जास्त नुकसानीच्या परिसरात सरसकट पंचनामे तर आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीचेही निर्देश !

 

जळगाव | जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जास्त नुकसानी झालेल्या परिसरात सरसकट पंचनामे करून आपत्तीग्रस्तांना शासकीय नियमानुसार मदत प्रदान करण्याचे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बर्‍याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने चाळीसगाव आणि पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा महापूर आला असून इतर तालुक्यांमध्येही मुसळधार पावसामुळे शेतीची मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यातील वाघूर, बोरी आणि अंजनी ही धरणे पूर्ण भरली असून गिरणा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्ह्याबाहेर असल्याने त्यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी चर्चा करून तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाल्याचे पंचनामे करून तात्काळ मदतीचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. जिथे खूप नुकसान झाले असेल त्या परिसरात
सरसकट पंचनामे करावेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. दरम्यान, अतिवृष्टीमुळे बर्‍याच ठिकाणी शेती वगळता नागरिकांची हानी झाली आहे. त्यांना शासकीय नियमानुसार तात्काळ मदत प्रदान करण्यात यावी अशा सूचना देखील पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. नुकसान झालेल्यांना शासकीय नियमानुसर भरपाई देण्यात येणार असल्याची ग्वाही गुलाबराव पाटील यांनी दिली.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments