R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुंबईकरांच्या रस्त्यांचे ‘रस्ते’ लागले, शेलारांनी साधला सेनेवर निशाणा

मुंबईकरांच्या रस्त्यांचे ‘रस्ते’ लागले, शेलारांनी साधला सेनेवर निशाणा

 

मुंबई | मुंबई महानगर पालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिलेले असतांना आता वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे सर्वच विरोधकांनी सत्तेत असलेल्या सेनेवर घणाघाती टीका केली आहे. त्यातच आता आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महानगर पालिका आणि शिवसेना पक्षावर निशाणा साधला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सुद्धा टोला लगावला आहे.

सुप्रियाताई, ‘सेल्फी विथ् खड्डे’ कार्यक्रम आता कुठे गेला?, असा सवालच आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळे यांना केला आहे. तसेच, मुंबईत गेल्या २५ वर्षांमध्ये रस्त्यांवर २१ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. कंत्राटदाराला महामार्ग मिळाला. मुंबईकरांच्या रस्त्यांचे “रस्ते” लागले, अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन खड्ड्यांच्या मुद्दयावरून शिवसेनेची पोलखोल करतानाच सेनेवर जोरदार निशाणा साधला होता. मुख्यमंत्र्यांनी काल केलेले विधान हे भाषणातील वाक्याप्रमाणे आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातले रस्ते ज्या विविध एजन्सीच्या अंतर्गत येतात त्या सगळ्या एजन्सीची बैठक घेतली असती तर आम्हाला पटलं असतं. त्याच्याही पुढे जाऊन एखाद्या तरी कंत्राटदारावर कारवाई केली असती तर आमचा विश्वास बसला असता. खड्डे बुजवण्यासाठी वापरात येणाऱ्या मालाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली असतील तर खरे वाटले असते. त्यामुळे खड्ड्याबाबत जी बैठक झाली तो सेल्फी विथ खड्डे सारखा दिखाऊपणा होता, अशी टीका शेलार यांनी केली.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments