R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या खड्ड्यांत गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्डयात घालायची भाषा करू नये, सेनेचा टोला

खड्ड्यांत गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्डयात घालायची भाषा करू नये, सेनेचा टोला

 

कल्याण | कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नाही असा आरोप रस्त्याची पाहणी करताना मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केला होता. तसेच त्यांनी खड्डे बुजविले गेले नाही तर सत्ताधारी पक्ष, अधिकाऱ्यांना आम्ही खड्ड्यात घालू असा इशारा सुद्धा शिवसेनेला दिला होता. यानंतर आता, शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी खड्ड्यात गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्ड्यात घालण्याची भाषा करु नये, असा टोला मनसे पाटील यांना लगावला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून मनसे आणि शिवसेना आमने सामने आली आहे

दिपेश म्हात्रे यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या २०१० सालच्या निवडणूकीत मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले होते. २०१५ साली मनसेचे ९ नगरसेवक निवडून आले. त्यांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे मनसे हा खड्डय़ात गेलेला पक्ष आहे. त्याने कुणाला खड्ड्यात घालण्याची भाषा करु नये. मनसेचेही नगरसेवक महापालिकेत होते. त्यांनी का खड्डे प्रकरणी कधी आवाज उठविला नाही असा सवालही म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.

२०१४ साली महापालिका हद्दीत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामावर २१ कोटी रुपये खर्च केले जात होते. त्यानंतर महापालिका हद्दीत काही रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे करण्यात आले. त्यामुळे २०१४ सालानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा खर्च कमी-कमी होत गेला. रस्ते विकासासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ३६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे ते सुद्धा मंत्रे यांनी बोलून दाखविले hote

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

Recent Comments