R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'शेतकरी हंबरडा फोडतोय, मुख्यमंत्री साहेब बळीराजाला चिंतामुक्त कधी करणार ?

‘शेतकरी हंबरडा फोडतोय, मुख्यमंत्री साहेब बळीराजाला चिंतामुक्त कधी करणार ?

 

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी होरपळून निघाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण पीक पाण्यात वाहून गेलं आहे. येन सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांवर उपसामीची वेळ आहे. खरीप हंगाम हातातून गेल्यामुळे आम्हाला सरकारने मदत करावी अशी मागणी राज्यातील शेतकरी करत आहेत. याच मुद्द्यावरुन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सरकारने शेतकऱ्यांची मदत करवी अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्रातला शेतकरी आज शेतामध्ये हंबरडा फोडत आहे. त्याच संपूर्ण शेत आता जलमय झालं आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बळीराजाला चिंतामुक्त कधी करणार ? असा सवाल खोत यांनी केला आहे. ते आज पत्रकार माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता.

‘शेतकऱ्यांवर कधी अस्मानी तर कधी सुलतानी अशी एका मागोमाग संकट येत आहेत. राज्य सरकार मात्र आम्ही तुम्हाला मदत करू, यापलिकडे काहीच बोलायला तयार नाही. महापुरातल्या आणि चक्रीवादळातील शेतकऱ्यांना राज्य सरकार कोणत्याही प्रकारची मदत होऊ शकले नाही. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण राज्यसरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे,’ असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments