R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या परमबीर सिंह रशियाला पळून गेल्याच्या चर्चा, गृहमंत्री वळसे पाटील म्हणतात की,

परमबीर सिंह रशियाला पळून गेल्याच्या चर्चा, गृहमंत्री वळसे पाटील म्हणतात की,

 

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप लावून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यातच मंत्री अनिल देशमुखांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर दुसरीकडे परमबीर सिंह यांनाअँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएच्या तपासाला सामोरे जात आहेत.

मात्र आजतागायत अनेक वेळा समन्स देऊनही परमबीर सिंह चौकशी आयोगासमोर हजर झाले नाहीत. यामुळे आता ते देश सोडून रशियाला गेल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र सरकार त्यांचा शोध घेत असल्याचे म्हटले आहे. भारत सरकारच्या परवानगीशिवाय ते देश सोडू शकत नाही, असेही वळसे-पाटील म्हणाले आहेत.

वळसे पाटील पुढे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्रालयाबरोबरच आम्हीदेखील परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. ते देश सोडून गेल्याच्या चर्चा मीही ऐकल्या आहेत, मंत्री असो, सरकारी अधिकारी असो, मुख्यमंत्री असो, भारत सरकारच्या परवानगीशिवाय कोणीही देशाबाहेर जाऊ शकत नाही. त्यांच्याविरोधात काय कारवाई करता येईल, त्यावर केंद्राशी चर्चा केली जाईल. महाराष्ट्र सरकार सध्या त्यांचा शोध घेत आहे. यासाठी त्यांच्याविरोधात एक लुकआउट नोटीस जारी केली आहे, असेही पाटील म्हणाले.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments