R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका

शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका

 

सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी तीन दिवसांपूर्वी ईडीचे अधिकारी शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी गेले होते. त्यांची चौकशी सुरु असताना अडसूळ यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलाविण्यात आली. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. सध्या तात्यांच्याबरोबर ईडीचा एक अधिकारी रुग्णालयातच थांबला आहे.

त्यातच आता ईडीच्या कारवाई विरोधात माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करून अटकेपासून दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. अडसुळांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. मात्र त्यानंतर त्यांना अन्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र ईडीचे अधिकारी त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोचले आणि त्यांनी त्यांची तब्येत बरी असल्याचा दावा केला. त्यानंतर अडसूळ यांनी दुपारी तातडीची सुनावणी घेण्याबाबत याचिका दाखल केली आहे. अश्याच प्रकारच्या प्रकरणात यापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका देखील न्यायालयासमोर प्रलंबित आहे.त्यामुळे या प्रकरणात अडसूळ याना दिलासा मिळणार का हे पाहावे लागणार आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments