R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हावासियांनी कडक लॉकडाऊन पाळावा व स्वतःसह प्रशासनाला सहकार्य...

जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हावासियांनी कडक लॉकडाऊन पाळावा व स्वतःसह प्रशासनाला सहकार्य करावे – शेखर सिंह

जिल्ह्यात कोरोना वाढता संसर्ग थांबत नसल्याने अखेर प्रशासनाने सोमवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन सुरू केला आहे. असे असतानाच मंगळवारी आलेल्या अहवालात दोन तीन सहा चार जणांचा अहवाल बाधित आला असून कोरोना संसर्ग वाढीचा वेग कायम आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २७% एवढ्यावर असून निगेटिव्ह अहवालांचा पेंडिंग डाटा भरण्यात आल्याने तो प्रत्यक्ष अहवालात कमी दिसत आहे. मात्र त्यावर न जाता आता बाधित वाढ रोखून जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हावासियांनी कडक लॉकडाऊन पाळावा व स्वतःसह प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

एप्रिलमध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३७% टक्के एवढा होता. त्यानंतर तो मे महिन्यात ३४ टक्केवर आलेला आहे. सध्या तो २७ टक्के असून पॉझिटिव्हिटी रेट खाली घसरत असला तरी बाधित वाढ कायम आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात ज्या संसर्ग साखळ्या निर्माण झालेले आहेत ते त्या तोडणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, असेही आवाहन शेखर सिन्हा यांनी केले आहे.

शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी देखील काळजी घेण्याची गरज अधिक आहे. मास्क, वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक आंतर याबाबी काटेकोरपणे पाळाव्यात. त्यासाठी प्रत्येक गावात सरपंच, पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांनी एक जून पर्यंत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. शहरी भागातील सर्व नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या भागात नियमांचे पालन होण्यासाठी सतर्क रहावे. पोलीस दलाकडून ही लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी काही उपाययोजना व निर्बंध जारी करण्यात आलेले आहेत, असेही शेखर सिंह यांनी सांगितले आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments