R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या जिममध्ये कसरत करत असताना सांगलीत बड्या डॉक्टरांचा मृत्यू |

जिममध्ये कसरत करत असताना सांगलीत बड्या डॉक्टरांचा मृत्यू |

सांगली | मागच्या काही दिवसापासून जिममध्ये व्यायाम करत असताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. यानंतर आता सांगलीतील एका बड्या डॉक्टराने आपला जीव गमवला आहे. बुधवारी सायंकाळी व्यायाम करण्यासाठी ते जिममध्ये गेले असता, त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं या घटनेमुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे.

सद्य घडलेल्या या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. डॉ. अशोक धोंडे असं मृत पावलेल्या ४७ वर्षीय डॉक्टरचं नाव असून ते शल्यचिकित्सक होते. दरम्यान बुधवारी सायंकाळी मृत डॉ. धोंडे हे नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये गेले होते. जिममध्ये काही काळ व्यायाम केल्यानंतर त्यांना थकवा जाणवायला सुरू झाला. त्यामुळे त्यांनी थोडीशी विश्रांती घेतली.

मात्र डॉ. अशोक धोंडे यांना आणखी अस्वस्थ वाटू लागलं. यामुळे जिममधील काहीजणांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं आहे. व्यायामासाठी गेलेल्या एका वरिष्ठ डॉक्टरचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments