R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "भाजपशी युती म्हणजे आत्महत्या, या पक्षानं साधला निशाणा"

“भाजपशी युती म्हणजे आत्महत्या, या पक्षानं साधला निशाणा”

 

गोवा |गोवा विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच पक्षांनी विजय मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच सेनेने सुद्धा २२ जागा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे जाहीर करून सत्ताधारी भाजपा पक्षाच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यातच आता मगोपचे नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दोनवेळा दगा दिलेल्या भारतीय जनता पक्षाशी पुन्हा एकदा युती करणे म्हणजे मगोपने आत्महत्या करण्यासारखा प्रकार आहे, असे प्रतिपादन मगोपचे नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी बांदोडा – फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दिल्ली आणि पश्‍चिम बंगालमधील पक्षांनी गोव्यात धाव घेतली आहे. या राजकीय पक्षांनी आपल्याशी संपर्कही साधला आहे; मात्र गोव्याचे भवितव्य हे युवा पिढी आणि सज्ञान गोमंतकीयांच्या हाती आहे. २०२२ हे गोव्यासाठी परिवर्तनाचे वर्ष असायला हवे. युतीचा विचार हा आपण नव्हे तर मगोपची केंद्रीय कार्यकारिणी ठरवते हेही त्यांनी नमूद केले.

गोव्यातील राजकारणाची पातळी एकदम घसरली असून कुणीही उठतो आणि काहीही बरळतो. पडेल आमदारांना तर कोणतेच तारतम्य राहिलेले नाही, असे सांगताना या लोकांच्या बरळण्याकडे कितपत लक्ष द्यायला हवे, हे आता गोमंतकीयांनीच ठरवायला हवे, असे ढवळीकर म्हणाले. सत्तर वर्षांहून जास्त वयाच्या राजकारण्यांना घरी बसवायला हवे. तरुण नव्या दम्याच्या युवा नेत्यांना प्राधान्य द्यायला हवे, असे सुदिन ढवळीकर यांनी नमूद केले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments