R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना कोर्टाकडून दिलासा नाही, होणार ईडीची चौकशी !

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना कोर्टाकडून दिलासा नाही, होणार ईडीची चौकशी !

 

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावण्यात आले होते. मात्र तब्येत बिघडल्यामुळे त्यांना त्याच दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांनी ईडीकडून सुरु असलेली चौकशी रद्द करण्याची मागणी केली होती मात्र आता त्यांनी केलेल्या अर्जावर कोर्टाकडून कोणताही दिलासा देण्यात आला नाही. त्यामुळे अडसूळ यांची ईडी मार्फत चौकशी अटळ असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आनंदराव अडसूळ यांच्या वकिलाने आज उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ईडीकडून अडसूळ यांची सुरू असलेली चौकशी आणि ECIR रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. ईडीच्या वकिलांनी त्याला कडाडून विरोध केला. आम्ही ECIR दाखल केला आहे. त्यात मनी लॉन्ड्रिंग झाली आहे. त्यामुळे अडसूळ यांची चौकशी होणे गरजेचं असल्याने अडसूळ यांच्या वकिलांनी केलेली मागणी मान्य होऊ नये, अशी विनंती ईडीच्या वकिलांनी कोर्टाला केली.

ईडीचे अधिकारी जेव्हा समन्स घेऊन आले तेव्हा अडसूळ यांच्यावर लाईफलाईन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आता त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असंही अडसूळ यांच्या वकिलाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. तर, आम्हाला बँकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची आहे. त्या संदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांचा कबुलीजबाब नोंदवाल आहे. काही बँक खातेदारांचा जबाबही नोंदवला आहे, असं ईडीच्या वकिलाने कोर्टात स्पष्ट केलं.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments