R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "कोरोनाशी ज्या जिद्दीने, ईर्षेने आपण लढलो त्याच ईर्षेने स्वच्छतेसाठी लढा"

“कोरोनाशी ज्या जिद्दीने, ईर्षेने आपण लढलो त्याच ईर्षेने स्वच्छतेसाठी लढा”

मुंबई | कोरोनाशी आपण जिद्दीने लढलो आणि त्याचे चांगले परिणाम समोर आले. याच ईर्षेने आपल्याला स्वच्छ महाराष्ट्र घडवायचा आहे. देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना स्वच्छता हेच अमृत आहे हे ध्यानात ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गावागावांतील सरपंचांना केले.

पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना परिस्थिती महाराष्ट्राने उत्तमरीत्या हाताळल्याबद्धल आपल्या सर्वांचे काैतुक करण्यात आले. आम्ही दिलेल्या सूचना आपण सगळ्यांनी पाळल्या त्याचेच हे फळ आहे. स्वच्छता आपल्याला पाहिजेच. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता ठेवणे गरजेच आहे. हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या शब्दांतच अमृत आहे. स्वच्छता हेच अमृत आहे. वैयक्तिक स्वच्छता असेल तर रोगराईला वाव मिळणार नाही, त्यामुळे आपले आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छतेच्या माध्यमातून हे अमृत मिळवा.

या कार्यक्रमास नाशिक येथून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार श्रीमती सरोज अहिरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते तर वर्षा येथील समिती कक्षातून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव अभय महाजन तसेच जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद उपस्थित होते.

यावेळी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान काही सरपंचांनी आपले मनोगत मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केले.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments