R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बिजनेस तब्बल ६८ वर्षानंतर टाटा ग्रुपने एअर इंडियाची मिळवली मालकी

तब्बल ६८ वर्षानंतर टाटा ग्रुपने एअर इंडियाची मिळवली मालकी

 

तब्बल ६८ वर्षांनंतर एअर इंडियाचे झाले खासगीकरण झाले असून एअर इंडियाची मालकी तब्बल ६७ वर्षांनी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे जाणार आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, टाटा सन्सकडून एअर इंडियासाठी लावण्यात आलेली बोली मंत्री गटानं मान्य केली आहे. दरम्यान अद्याप टाटा सन्स किंवा एअर इंडियाकडून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

नागरी उड्डाण मंत्रालय, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी टाटा समूहाचे प्रतिनिधी आणि स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांची भेट घेतली.ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालानुसार, पॅनलने एअर इंडियासाठी टाटा समूहाची निवड केली आहे.

सरकारी एअरलाईन्स कंपनी एअर इंडिया टाटा खरेदी करणार आहेत. ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियासाठी पॅनलने टाटा ग्रुपची निवड केली आहे. एअर इंडियासाठी टाटा ग्रुप आणि स्पाइसजेटच्या अजय सिंह यांनी बोली लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार लवकरच अधिकृतपणे याची घोषणा करु शकते.

दरम्यान, जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विमान सेवा रोखण्यात आल्या होत्या. त्यानंतर विमान सेवा बहाल झाल्यानंतर २९ जुलै १९४६ टाटा एअरलाइन्सचं नाव बदलून त्याचं नाव एअर इंडिया लिमिटेड करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यानंतर १९४७ मध्ये एअर इंडियातील ४९ टक्के भागीदारी भारत सरकारनं घेतली होती. १९५३ मध्ये याचं पूर्ण राष्ट्रीयीकरण करण्यात आलं होतं.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

 २४ तासात तब्बल ६०० कोटी रुपयांच्या Ola Electric Scooter ची विक्री,

नवी दिल्ली |  Ola Electric Scooter ला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून Ola चे फाउंडर आणि CEO भाविश अग्रवाल  यांनी Ola Electric ने विक्रीच्या...

सेन्सेक्स, निफ्टी विक्रमी उच्चांकावर, बाजारपेठा ताकदीने उघडल्या !

  मुंबई |  आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर खुले झाले आहेत. सेन्सेक्स 59,400 तर निफ्टी 17,700 वर उघडला आहे. सध्या सेन्सेक्स 350...

अदानी समुहात 45 हजार कोटींची गुंतवणूक करणाऱ्या फर्जी कंपन्यांचा मालक कोण? भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचा सवाल

NSDL ने (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने) अदानी ग्रृपशी निगडीत असलेल्या तीन परदेशी गुंतवणुकदार कंपनीवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अदानी समुहाचे शेअर्स ढासलळे आहेत. या तीनही...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments