R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या दिव्यातील लस महोत्सवावरुन भाजपा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवणार काळे झेंडे

दिव्यातील लस महोत्सवावरुन भाजपा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवणार काळे झेंडे

 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यातच आता दिव्यात शनिवारी लसमहोत्सव आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत एकाच दिवशी तब्बल १० हजार जणांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे हजेरी लावणार आहेत.

मात्र दुसरीकडे आता याच लस महोत्सवाच्या मुद्यावरून भाजपने आक्षेप घेत शिवसेनेने स्वत:ची जाहीरातबाजी करून पंतप्रधान मोदी यांना डावलले असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे लसीकरणाच्या दिवशी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. यामुळे आता दिव्यात पाणी, डम्पींग पाठोपाठ आता लस महोत्सवातही शिवसेना विरुध्द भाजप राजकारण तापणार असल्याचे दिसत आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून गांधी जयंत्तीचे औचित्य साधून दिव्यात शनिवारी लस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेर्पयत हा महोत्सव असणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. त्या अनुषंगाने दिव्यात शिवसेनेच्या वतीने बॅनर लावण्यात आले असून त्यावर शिवसेनेच्याच नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.

वास्तविक पाहता, लसीकरण मोहीम वेगाने पुढे जावी, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे. त्यातही त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच लस उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो यावर असणे अपेक्षित होते, असे मत आता दिवा भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. यामुळे याचा निषेध करीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखविले जाणार असल्याचा इशारादेखील भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments