R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ब्रिटिश नागरिकांना भारतात आल्यानंतर १० दिवसांचे क्वारंटाईन सक्तीचे

ब्रिटिश नागरिकांना भारतात आल्यानंतर १० दिवसांचे क्वारंटाईन सक्तीचे

 

इंग्लंडने जारी केलेल्या जाचक प्रवासी नियमानुसार, काही देशांमधून येणाऱ्या नागरिकांना लसीकरण पूर्ण झालेले असले तरी १० दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. क्वारंटाईन रहावे लागणार असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताचा देखील समावेश करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता त्या पाठोपाठ भारताने सुद्धा इंगलंडला जशाच तसे उत्तर दिले आहे.

४ ऑक्टोबरपासून इंग्लंडच्या नागरिकांना भारतात यायचे असल्यास १० दिवसांसाठी क्वारंटाईन होणे सक्तीचे करण्यात आले आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या ब्रिटिश नागरिकांना देखील हे नियम लागू असणार आहेत. भारत सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार ब्रिटिश नागरिकांना भारतात येण्यासाठी तीन वेळा कोव्हीड चाचणी करावी लागणार आहे.तसेच १० दिवस घरी अथवा हॉटेलमध्ये क्वारंटाईन असम देखील बंधनकारक असणार आहे.

काही दिवसांपूर्वी ब्रिटनने भारताच्या कोव्हीड लसीकरण प्रमाणपत्रावर शंका उपस्थित करत लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना देखील इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर १० दिवसांसाठी क्वारंटाईन राहणे सक्तीचे केले होते. इंग्लंडच्या या निर्णयाचा भारताने जोरदार विरोध केला होता. अशातच आता भारत सरकारने देखील ब्रिटिश नागरिकांवर त्याच पद्धतीचे नियम लादून त्याच पद्धतीने उत्तर दिले आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments