R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या खडसे साहेब, एखादा शूटर लावून मला मारुन टाका, चंद्रकांत पाटलांचा टोला

खडसे साहेब, एखादा शूटर लावून मला मारुन टाका, चंद्रकांत पाटलांचा टोला

भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. त्यातच त्यांच्या पत्नी आणि जावयाला यापूर्वी ईडीने नोटीस बजावली होती. तर दुसरीकडे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष अधिक वाढताना दिसून येत आहे. एखादा शूटर लावून मला मारून टाका, असं आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी बोदवड येथे एका व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत माहिती देत, मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीदेखील पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसे यांना उत्तर दिलं. यावेळी त्यांनी खडसे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला होता.

“एकनाथ खडसे हे मी युती तोडली असं अहंकाराने आजही ते सांगतात. पण सध्या एकनाथ खडसे यांचं डोकं ठिकाणावर नाही. पक्ष बदलल्यानंतरदेखील एकनाथ खडसे यांना अजूनपर्यंत काही मिळाले नाही. त्यातच भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना कधी लपावं लागतं, तर कधी पळावं लागतं अशी परिस्थिती आहे. त्यांना तीन तीन वेळा कोविड त्यांना होतो, त्यामुळे त्यांच्याविषयी मला सहानुभूती आहे” अशी मिश्कील टीका शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments