R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ...पण नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ राहतील - जयंत पाटील

…पण नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ राहतील – जयंत पाटील

 

मागच्या काही दिवसांपासून पालकमंत्री आणि मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात संघाशी चांगलाच पेटलेला दिसून येत आहे. त्यातच सुहास कांदे यांनी पत्रकार परिषेद घेऊन भुजबळ यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी पूर्णपणे भुजबळ यांच्या पाठीमागे खंबीर उभी असल्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

आमदार सुहास कांदे यांच्यासोबतचा वाद मिटेल आणि नाही मिटला तरी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हेच राहतील, असे मंत्री जयंत पाटील यांनी येवला येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. कांदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत भुजबळ यांना पालकमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या बैठकीनिमित्त आलेले प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले, छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार कांदे यांच्यातील वाद हा स्थानिक असून अंडरवर्ल्डमधून आलेल्या धमकीबाबत मला माहिती नाही.

ईडीच्या कारवाईबाबत बोलताना पाटील म्हणाले, अनिल देशमुख, एकनाथ खडसे यांना नाहक अडचणी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. सुडाचे राजकारण सुरू आहे. परमबीर सिंह यांना कोण वाचवत आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमतीप्रमाणे महागाईही वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतीचा पैसा केंद्राकडे जातोय. महागाईचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचे पाटील यांनी सांगितले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments