R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना विदेशात पळून जाण्यासाठी भाजपने मदत...

“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना विदेशात पळून जाण्यासाठी भाजपने मदत केली”

 

नवी दिल्ली | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लावून एकच खळबळ उडवून दिली होती. या आरोपानंतर देशमुख यांची चौकशी करण्यात आली असून त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन ईडीच्या चौकशीला समोरे जावे लागले होते. त्यातच परमबीर सिंह यांच्या अडचणी सुद्धा वाढल्या होत्या.

अनिल देशमुख या प्रकरणासाठी चांदीवाल आयोग चौकशी प्रक्रिया पुर्ण करत होता, मात्र या आयोगासमोर परमबीर सिंग सतत गैरहजर होते, तसेच या प्रकरणात परमबीर सिंग यांच्या विरोधात देखील अनेक पुरावे सापडले आहेत, याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे अटक होण्याच्या भीतीने परमबीर सिंग परदेशात पळून गेले असावेत असा संशय तपास यंत्रणांनी केला आहे

समोर आलेल्या माहितीनुसार परमबीर सिंग यांचे शेवटचं लोकेशन गुजरातच्या अहमदाबादमध्ये होतं अहमदाबादमधूनच त्यांनी केंद्रातल्या भाजप नेत्यांना संपर्क साधला होता तसेच परमबीर सिंग यांना देशातून पळून जायला भाजप नेत्यांनी मदत केली असून परमबीर सापडले तर अनेक गोष्टींचा खुलासा होईल असा आरोप कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments