R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया सरकार पडेल असे भाकीत करणारा जोतिष भाजपने बदलावा - बाळासाहेब थोरात

सरकार पडेल असे भाकीत करणारा जोतिष भाजपने बदलावा – बाळासाहेब थोरात

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडण्याच्या वेगवेगळ्या तारखा भारतीय जनता पक्षाकडून सत्ता जाहीर करण्यात येत आहे. त्यातच राणे कुटुंबीयांनी तर थेट सरकार पडण्याच्या अनेक तारखा जाहीर केल्या होत्या मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार अद्यापही पूर्णपणे स्थिर आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजपचं सरकार येणार असल्याचं भाकीत केलं होत.

आता फडणवीस आणि शेलार यांच्या त्या भाकितावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. आघाडीचं सरकार आल्यापासून भाकीतं केली जात आहेत. आता भाजपने ज्योतिषी बदलावा, असा खोचक टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपकडून भाकीतं केली जातायत. मात्र आता त्यांना ज्योतिषी बदलण्याची गरज आहे, असं थोरात म्हणाले.

मराठावाडा विदर्भात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या भागांची पाहणी करणार आहेत. त्यावरही थोरात यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण, अमित देशमुख मराठवाड्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शेतकऱ्यांना मदत करणं हे महत्त्वाचं आहे. त्याला ओला दुष्काळ नाव द्यायचं की अजून काही हा नंतरचा विषय आहे. शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं हे पाहावं लागेल. मोजदाद केल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही. येत्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होऊन निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या, भाजपच्या या नेत्यानं साधला निशाणा

  खासदार मोहन डेलकर यांच्यानंतर शिवसेनेकडून दादरा नगर- हवेली लोकसभा पोटनिवडणुकीकरिता मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरा नगर- हवेली...

समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव ‘दाऊद?? मालिकांनी दिला आणखी एक पुरावा

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. त्यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने...

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments