R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, January 24, 2022

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या रहस्यावर नारायण राणे बोलणार का ? -...

धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या रहस्यावर नारायण राणे बोलणार का ? – जेष्ठ पत्रकार अनिल थत्ते.

27 जानेवारी 1951मध्ये सर्व सामान्य कुटुंबात आनंद चिंतामणी दिघे यांचा जन्म झाला तरुण वयात येताच हिंदुहृदयसम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांची कार्यशैली आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांसाठी काम करण्याच्या प्रेरणेने आणि गुरू स्वर्गवासी माजी आमदार शाबीरभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संपूर्ण आयुष्य 4 अकक्षारांसाठी बहाल केले ती 4 अक्षरे म्हणजेच ” शिवसेना” बाळासाहेबांचं ठाण्यावर विशेष प्रेम होतं आणि आनंद दिघे यांनी बाळासाहेबांना कधीच निराश केले नाही. अनेक आंदोलन झाले कित्येक वेळा आनंद दिघे यांना कारावास देखील भोगावा लागला. “अब ये जंजीर जनता तोडगी ” या आंदोलनाने जोर पकडला जनतेचे प्रेम आणि कट्टर साथीदारांची आक्रमकता या सगळ्या समोर प्रशासन हरले आणि आनंद दिघे यांचे धर्मवीर आनंद दिघे साहेब झाले. ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत असतांना रोज अनेक जिल्ह्यातून गोरगरीब जनता आपले प्रश्न घेऊन साहेबांकडे येत आणि सगळ्यात विशेष म्हणजे कधीच कोणी ऱ्या दरबारातून खाली हात गेला नाही. ज्या व्यक्तिच्या डोक्यावर हाथ ठेवला त्याचे आयुष्य बदलून टाकले. साहेबांचा शब्द म्हणजे शेवटचा असे समीकरण झाले होते कदाचित त्याचमुळे काही वरिष्ठ पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये त्यांच्या बद्दल नाराजी देखील होती.26 ऑगस्ट 2001 मध्ये धर्मवीर ठाण्याला पोरके करून गेले. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या मृत्यूवर अनेक तर्क वितर्क काढले जात होते त्यांच्या मृत्यूचे गुड नक्की काय आहे हे आज 20 वर्षांनी देखील उलघडले नाही.

जेष्ठ पत्रकार श्री अनिल थत्ते यांनी त्यांना आनंद दिघे यांना “धर्मवीर” ही उपाधी बहाल केली होती. ठाण्यातील राजकारणाचा खडा अणं खडा माहीती असणाऱ्या अनिल थत्ते यांनी आपल्या गगनभेदी वृत्तपत्रा द्वारे अनेक वेळा ठाण्याचे व ठाण्यातील राजकारणाचे दर्शन घडवले आहे. अचानक आज 20 वर्षांनी त्यांनी त्यांचा शो ” दि अनिल थत्ते शो” मध्ये आनंद दिघे यांच्या मृत्यूचे चे रहस्य यावर आज भाष्य केले आहे . त्यात त्यांनी स्पस्ट सांगितले आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा मृत्य हृदयविकाराच्या झटक्याने नैसर्गिक आहे पण त्यात त्यांनी एक खुलासा केला आहे जो अतिशय धक्कादायक आहे त्यांनी असे सांगितले आहे की जेव्हा आनंद दिघे सिंघानिया हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते तेव्हा त्यांना भेटायला राज ठाकरे आणि नारायण राणे आले होते व त्या दोघां पैकी एकाने त्यांना ठाणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा द्यायला सांगितला होता आणि त्यामुळे आनंद दिघे यांना खूप यातना झाल्या होत्या. त्यात अनिल थत्ते असे देखील बोलले की ह्या सर्व प्रकारच्या खुलासा नारायण राणे यांनी करावा व आनंद दिघे यांना हा आदेश देणारे कोण होते हे देखील स्पस्ट करावे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणारे आणि शिवसेना ह्या 4 अक्षारांसाठी आपल्या आयुष्याचे निर्माल्य करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या रहस्य मध्ये एक वेगळी चर्चा सुरू होण्याचे चिन्ह आहे.

https://youtu.be/TfZ7bEtewZg

loknews24tass

Author: loknews24tass

RELATED ARTICLES

मोठी बातमी | विधानसभेत ‘शक्ती कायदा’ एकमताने मंजूर

  मुंबई | मागच्या अणे दिवसांपासून मागणी होत असलेल्या शक्ती कायद्याला अखेर हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी तथा विरोधकांनी एकमताने मंजुरी दिली आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या...

नवाब मलिक यांचे भाजपाला सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचे जाहीर आव्हान

  महाविकास आघाडी सरकार हे बहुमताचे सरकार असल्यामुळे भाजपने हिंमत असेल तर सरकारविरोधात अविश्वास ठराव आणावा, असे आव्हानच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक...

सभागृहातच अजित पवारांनी भास्कर जाधवांना सुनावलं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’

मुंबई | विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं आहे. शिवसेना आमदार भास्कर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, मात्र दुसरीकडे भाजपने दर्शवली नाराजी

  मुंबई | हिवाळी अधिवेशन महाविकास आघाडी सरकार आज गुंडाळणार अशी चर्चा होती. मात्र, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी २८ डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत...

मुस्लिमांना उल्लू बनवण्याच काम खा. इम्तियाज जलील करतायेत – नवाब मलिक

  मुंबई | मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरुन एमआयएम'ने महाराष्ट्रात तिरंगा रॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर...

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचे विरोधकांची मागणी

  मुंबई | एसटी कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होण्यासाठी आम्ही...

पंतप्रधान मोदींनी घेतली आढावा बैठक, सर्व राज्यांना दिला हा महत्वपूर्ण सल्ला

  नवी दिल्ली | जगभरात दहशत असलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनची रुग्णसंख्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय आढावा...

Recent Comments